Photo – Mumbai Rain घरात, बस आगारात, रेल्वे स्थानकांत पाणीच पाणी!

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र गेल्या २४ तासांपासून पावसाचा जोर वाढला असल्याने शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. दक्षिण मुंबई परिसर जलमय झाला असून लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच बस आगार, रेल्वे स्थानकेही जलमय झाली आहेत.