झटपट वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय!

Mumbai

लठ्ठपणा ही आजच्या जीवन पद्धतीमधील एक मुख्य समस्या बनली आहे. प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाला सामोरे जाताना दिसत आहे. बहुतांश लोक सुरुवातीला वजन वाढवण्याकडे लक्ष देत नाहीत. परंतु, जेव्हा वजन जास्त प्रमाणात वाढते तेव्हा ते कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र हे वजन काही नैसर्गिक पदार्थांच्या सेवनाने नियंत्रणात राहते. ते पदार्थ कोणते आहेत? ते आपण पाहणार आहोत.

stare
ताक

 

दही

दह्याचे सेवन केल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते. प्रत्येक दिवशी सकाळी रिकाम्या पोटी घरातच तयार करण्यात आलेले एक ग्लास ताक प्यावे. त्यामध्ये स्वादानुसार थोडेसे काळे मीठ आणि हिंग-जीरा पावडर घालण्यास काहीच हरकत नाही.

honey with hot water
मध आणि पाणी

मध 

मध लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात एक चमचा मध टाकून घेतल्याने याचा चांगला फायदा होतो.

amla
आवळा

आवळा

आवळा आणि हळद समान प्रमाणत घेऊन बारीक चूर्ण तयार करुन घेणे. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास कंबर बारीक होण्यास मदत होते.

carrot salad
गाजर

गाजर

गाजराचे भरपूर सेवन करावे कारण आधुनिक विज्ञानानेही गाजर खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जेवणासोबत नियमित गाजर सेवन करणे शरीराकरता फायदेशीर आहे.

papaya
पपई

पपई

पपई या फळाचे नियमित सेवन केल्याने चरबी कमी होण्यास मदत होते. याकरता पपईचे दररोज सेवन केल्यास कंबरेवरची अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here