World Vegetarian Day: जाणून घ्या, शाकाहारी जेवणाचे फायदे

संपूर्ण जगात दरवर्षी जागतिक शाकाहारी दिवस १ ऑक्टोबर रोजी साजरा होतो. हा उत्तर अमेरिकन व्हेजिटेरियन सोसायटीचा स्थापना दिन असून १९७८ मध्ये आंतरराष्ट्रीय शाकाहारी असोसिएशनने शाकाहारातून आनंद, जीवन-वृद्धी अशा शक्यतांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच नैतिक, पर्यावरणीय, आरोग्य आणि मानवी फायद्यांविषयी जागरूकता आणण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरूवात केली.