डॉक्टरांनी सेलिब्रेट केला ‘योगा दिन’

जागतिक योगा दिनानिमित्त एरवी हातात स्टेटस्कोप घेऊन रुग्णांना तपासणारे डॉक्टर्स ही योगा करताना पाहायला मिळाले. आज सकाळपासूनच मुंबईत अनेक ठिकाणी योगा प्रशिक्षणाचं आयोजन‌ करण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील‌ सरकारी आणि पालिका हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही योगा दिनाला चांगला प्रतिसाद दिला. मुंबईतील मुख्य पालिका हॉस्पिटल्स केईएम,‌ नायर आणि सायन या तिन्ही हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सकाळी उठून हॉस्पिटलच्या आवारातच योगा केला. तर, सरकारी हॉस्पिटलपैकी जे.जे, सेंट जॉर्ज आणि जीटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनीही योगा करत आपल्या दिवसाला सुरुवात केली.

Mumbai