घरश्रावण स्पेशलश्रावण विशेष : तीळ-खोबऱ्याच्या 'सारोट्या'

श्रावण विशेष : तीळ-खोबऱ्याच्या ‘सारोट्या’

Subscribe

आज आपण तीळ-खोबऱ्याच्या खुसखुशीत ‘सारोट्या’ची रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य

- Advertisement -
  • १ वाटी तीळ
  • अर्धी वाटी शेंगदाणे
  • अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस
  • १ वाटी गूळ
  • १ वाटी बारीक रवा
  • १ छोटा चमचा वेलची पूड
  • साजूक तूप

कृती

सर्वप्रथम रव्यात एक टेबलस्पून तुपाचं कडकडीत मोहन घालून तो पाण्याने मळून घ्यावा आणि बाजूला ठेवावा. नंतर तीळ मंद आचेवर खमंग भाजून घ्यावेत. त्यानंतर शेंगदाणे आणि खोबऱ्याचा कीसदेखील भाजून घ्यावा. तीळ आणि शेंगदाण्याचा कूट एकत्र बारीक करून घ्यावा. मग गूळ बारीक किसून घ्यावा. हे झाल्यावर तीळ आणि शेंगदाण्याचा कूट, खोबऱ्याचा कीस आणि गूळ एकत्र करावा आणि सगळं मिश्रण मिक्सरमध्ये एकत्र बारीक करून घ्यावं. बारीक केल्यावर या तयार मिश्रणात वेलची पूड घालावी. ही तयारी झाल्यावर भिजवलेल्या रव्याचे लिंबा एवढे गोळे करावे. प्रत्येक गोळ्याची पारी करून त्यात एक टेबलस्पून तीळ-खोबऱ्याचं मिश्रण घालून साटोऱ्या हलक्या हाताने साटोऱ्या लाटून घ्याव्यात आणि साजूक तुप टाकून तव्यावर छान खरपूस भाजून घ्याव्यात. या साटोऱ्या चवीला अतिशय मस्त लागतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -