घरश्रावण स्पेशलShravan Somvar: जाणून घ्या, पहिल्या श्रावणी सोमवार व्रताविषयी...

Shravan Somvar: जाणून घ्या, पहिल्या श्रावणी सोमवार व्रताविषयी…

Subscribe

श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो.

सोमवार हा शंकराचा वार म्हणून समजला जातो. देवांचा देव म्हणजे महादेव…. श्रावण महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घरात हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावर पडतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजन एका विशिष्ठ पद्धतीने केले जाते. याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे. याचे एक कारण म्हणजे श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना मानला जातो.

श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहेत. मात्र, यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो. महाराष्ट्रासह अन्य भागात २१ जुलै २०२० रोजी श्रावण सुरू झाला असून, पहिला श्रावणी सोमवार, महत्त्व आणि त्या व्रताविषयी जाणून घेऊया…

- Advertisement -

श्रावण महिना महादेव शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते, असे सांगितले जाते. श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व असते. शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. तसेच श्रावणात शिव प्रतीकांपैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते.

असे करावे सोमवारचे व्रत

श्रावणी सोमवारच्या व्रतात भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. हे सोमवारचे व्रत तीन प्रकारचे असते. सोमवार, सोळा सोमवार आणि सौम्य प्रदोष. हे व्रत श्रावण महिन्यात सुरू करणे शुभ मानले जाते.
श्रावणी सोमवारचे व्रत सूर्यादयापासून प्रारंभ करून तिसऱ्या प्रहरापर्यंत केले जाते.

- Advertisement -
  • श्रावणी सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर उठावे.
  • पूर्ण घराची स्वच्छता करावी व स्नान करावे.
  • गंगा जल वा पवित्र पाणी घरात शिंपडावे.
  • घरातच किंवा पवित्र ठिकाणी भगवान शिवाची मूर्ती किंवा चित्र ठेवावे.
  • पूजेची तयारी झाल्यानंतर खालील मंत्राने संकल्प करा.
    `मम क्षेमस्थैर्यविजयारोग्यैश्वर्याभिवृद्धयर्थं सोमव्रतं करिष्ये`

`ऊँ नमः शिवाय` हा मंत्र म्हणून शिव व पार्वतीची षोडषोपचारे पूजा करावी. पूजेनंतर व्रताची कहाणी वाचून त्यानंतर आरती करून प्रसाद वाटावा. मग भोजन किंंवा फलाहार करावा.


श्रावण विशेष : श्रावण मासारंभ, जाणून घ्या महत्त्व

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -