घरक्रीडाफोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये कोहली एकमेव भारतीय 

फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये कोहली एकमेव भारतीय 

Subscribe

फोर्ब्सच्या २०२० वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील १०० खेळाडूंच्या यादीत कोहलीचा समावेश होता. त्याचे वार्षिक उत्पन्न २६ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतके आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानावर आणि मैदानाबाहेरही नवनवे विक्रम रचत असतो. फोर्ब्सच्या २०२० वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील १०० खेळाडूंच्या यादीत कोहलीचा समावेश होता. मागील वर्षीच्या यादीत १०० व्या स्थानावर असणाऱ्या कोहलीने यंदा ६६ व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न २६ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतके आहे. या यादीत स्थान मिळवलेला कोहली हा एकमेव भारतीय आणि क्रिकेटपटू आहे.

वार्षिक उत्पन्न २६ मिलियन डॉलर्स

कोहली फोर्ब्सच्या २०२० वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील १०० खेळाडूंच्या या यादीत ६६ व्या स्थानावर असून त्याचे वार्षिक उत्पन्न २६ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतके आहे. यापैकी २४ मिलियन डॉलर्स हे जाहिरातींमधून, तर उर्वरित २ मिलियन डॉलर्स हे मानधन आणि पुरस्कारांच्या माध्यमातून कोहलीला मिळतात. सध्या तो प्युमा, ऑडी इंडिया, फिलिप्स इंडिया आदी नामांकित कंपन्यांचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.

- Advertisement -

रॉजर फेडरर अव्वल

१ जून २०१९ ते १ जून २०२० या काळातील उत्पन्नाच्या आधारे फोर्ब्सने ही १०० खेळाडूंची यादी तयार केली आहे. या यादीत महान टेनिसपटू रॉजर फेडरर अव्वल स्थानी असून त्याचे मागील १२ महिन्यांतील उत्पन्न १०६.३ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतके आहे. स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो (१०५ मिलियन डॉलर्स) आणि लिओनेल मेस्सी (१०४ मिलियन डॉलर्स) हे या यादीत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -