घरक्रीडावनडे संघात पुनरागमन करायचेय - रहाणे

वनडे संघात पुनरागमन करायचेय – रहाणे

Subscribe

मानसिकदृष्टया मी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळण्यासाठी तयार आहे, असे रहाणे म्हणाला.

अजिंक्य रहाणे हा भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज असून उपकर्णधारही आहे. परंतु, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आले आहे. रहाणेने आतापर्यंत ९० एकदिवसीय सामने खेळले आहेत, पण त्यापैकी अखेरचा सामना हा त्याने फेब्रुवारी २०१८ मध्ये खेळला होता. मात्र, तो आता एकदिवसीय संघात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे.

कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार

एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास मी तयार आहे, मग ते सलामीवीर म्हणून असो किंवा चौथ्या क्रमांकावर. मला सलामीवीर म्हणून खेळायला आवडते, पण संघाच्या हितासाठी चौथ्या क्रमांकावर खेळण्यास माझी कधीही हरकत नसते. मला आता एकदिवसीय संघात पुनरागमन करायचे आहे. मात्र, मला पुन्हा संधी मिळेल का आणि कधी मिळेल, हे सांगणे अवघड आहे. मानसिकदृष्टया मी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळण्यासाठी तयार आहे. तुम्ही सकारात्मक पद्धतीने विचार करणे आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे, असे रहाणे म्हणाला. रहाणेने आतापर्यंत ९० एकदिवसीय सामन्यांत ३५.२६ च्या सरासरीने तीन शतकांसह २९६२ धावा केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -