घरक्रीडाइएसपीएनच्या वर्ल्ड फेम यादीत ११ भारतीय खेळाडू

इएसपीएनच्या वर्ल्ड फेम यादीत ११ भारतीय खेळाडू

Subscribe

विराट ११व्या स्थानावर

इएसपीएनतर्फे उत्कृष्ट खेळाडूंची ‘वर्ल्ड फेम’ यादी नुकतीच जाहिर झाली. ज्यामध्ये ११ भारतीय खेळाडूंनी जागा मिळवली आहे. ज्यामध्ये कोहली आणि धोनी हे टॉप २० मध्ये असून कोहली ११ व्या तर धोनी २० व्या स्थानावर विराजमान आहे. कोहलीने सेरेना विलियम्सला मागे टाकत ११वे स्थान मिळवले आहे. तर धोनीने मारीया शारापोवा आणि ओझिलला मागे टाकत २०वे स्थान प्राप्त केले आहे. ही यादी तीन निकषांवर तयार केली जाते. खेळाडूंचा गुगल ट्रेन्ड स्कोर, सोशल मीडिया फॉलोइंग आणि जाहीरातींच्या करारातून आलेल्या पैशांची रक्कम यावर अवलंबून आहे.

या यादीत भारताच्या आणखी सात क्रिकेटर्सचा समावेश आहे. ज्यात रोहित शर्मा ३०व्या, सुरेश रैना ४१व्या, अश्वीन ७१व्या, हरभजन ८०व्या, गंभीर ८३व्या आणि शिखर धवन ९४व्या स्थानावर आहे. क्रिकेटर्सशिवाय बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल ५०व्या तर टेनीस प्लेयर सानिया मिर्झा १००व्या स्थानावर आहे.

- Advertisement -

पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्टीयानो रोनाल्डो सलग तिसऱ्या वर्षी या यादीमध्ये अव्वल स्थानी असून मेस्सी दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोनाल्डोने पृष्ठांकन करारांतून ४० मिलियन मिळवले असून १२१.७ मिलियन फॅालोवर्ससह पहिल्या स्थानी आहे.
भारताकडून पहिल्या स्थानी असणाऱ्या विराटने जाहीरातींच्या करारातून १७.४ मिलियन मिळवले असून ३६.९ मिलियन फॅालोवर्सह ११व्या स्थानावर विराजमान आहे. धोनीने जाहीरातींच्या करारातून १६ मिलियन मिळवले असून २०.५ मिलियन फॅालोवर्सह २०व्या स्थानी आहे. या यादीत टॉप १० मध्ये नेमार,रॉजर फेडरर, टायगर वूड्स, केविन दुरान्त, राफेल नदाल यांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एबी डिव्हिलियर्स या लिस्टमध्ये ९९व्या स्थानावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -