घरक्रीडारोहित शर्माला भरावा लागला १२ लाखांचा दंड

रोहित शर्माला भरावा लागला १२ लाखांचा दंड

Subscribe

किंग्स इलेव्हन पंजाबसोबत झालेल्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला १२ लाखांचा दंड भरावा लागला आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला १२ लाखांचा दंडज भरावा लागला आहे. शनिवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात सामना झाला. या सामन्यात पंजाबने आपले ८ गडी राखत विजय मिळवला. हा सामना संपल्यानंतर रोहित शर्माला १२ लाखांचा दंड आकारण्यात आला. सामन्यादरम्यान षटकांचा वेग (स्लो ओव्हर रेट) न रोखल्यामुळे रोहितला हा दंड भरावा लागला.

मुंबई इंडियन्सची विजयाची पंरपरा मोडली

हा सामना पंजाबच्या मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडिअम येथे संपन्न झाला. या मैदानावर झालेले सर्व सामने मुंबई इंडियन्सने जिंकली आहेत. परंतु, कालच्या सामन्याने गेल्या आठ वर्षांची परंपरा मोडली. २०११ पासून या मैदानावर मुंबई इंडियन्स चार सामने खेळली होती. या चारही सामन्यांमध्ये मुंबई जिंकली होती. परंतु, कालच्या पराभावनंतर मुंबई इंडियन्सची या मैदानावर जिंकण्याची परंपरा मोडली गेली.

- Advertisement -

‘असा’ रंगला सामना

किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजांसमोर मुंबई इंडियन्सचे खेळाडू फार काही करिष्मा करु शकले नाहीत. तरीही मुंबईने २० षटकांत ७ बाद १७६ धावा केल्या. या सामन्यात युवराजकडे चाहत्यांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या. परंतु, युवराज फार काही करु शकला नाही. पंजाबने मुंबईला चांगलेच प्रत्युत्तर दिले. पंजाबने दणकेबाज फलंदाजी केली. त्यामुळे ८ गडी राखत पंजाबचा विजय झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -