घरक्रीडाशहिदांच्या कुटुंबीयांना बीसीसीआयकडून २० कोटींची मदत

शहिदांच्या कुटुंबीयांना बीसीसीआयकडून २० कोटींची मदत

Subscribe

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना २० कोटी रुपये देण्याचा निर्णय भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. आर्मी वेल्फेयर फंडात बीसीसीआय ही रक्कम जमा करणार आहे.प्रशासक समितीने आर्मी वेल्फेअर फंडात २० कोटी रुपये जमा करण्याची परवानगी दिली आहे. सुरूवातीला काही रक्कम देण्यात येणार आहे. तसेच चेन्नई येथे सुरू होणार्‍या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) शुभारंभीच्या सामन्यात हवाई दल, नौदल आणि लष्करी अधिकार्‍यांना आमंत्रित करण्याचा विचार बीसीसीआयकडून केला जात आहे.

आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असा होणार आहे. आयपीएलच्या शुभारंभीच्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि कर्णधार विराट कोहली उपस्थित असतील, अशी माहिती एका अधिकार्‍याकडून देण्यात आली. गेल्या वर्षी आयपीएल सामन्यांच्या उद्घाटन समारंभासाठी १५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. यावर्षी हे बजेट वाढवून त्याची रक्कम २० कोटी करण्यात आली आहे आणि ही रक्कम आर्मी वेल्फेअर फंडात जमा करण्यात येणार असल्याचे समजते.

- Advertisement -

पुलवामा हल्ल्यानंतर बीसीसीआय खंबीरपणे सैनिकांच्या मागे उभी राहिली आहे.भारत विरूद्ध ऑस्टे्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना सीआरपीएफ जवानांच्या कॅप देत मैदानात उतरवले होते.तसेच देशभावनेचा विचार करत आगामी विश्वचषकात भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्याबाबत देखील आयसीसीसमोर कठोर भुमिका मांडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -