घरक्रीडा'होय! २०११ची भारत - इंग्लंड लॉर्डस कसोटी फिक्स होती'

‘होय! २०११ची भारत – इंग्लंड लॉर्डस कसोटी फिक्स होती’

Subscribe

२०११ साली लॉर्डसवर भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी झाली होती. ही कसोटी फिक्स असल्याची माहिती अनिल मुनव्वर या फिक्सरनं दिली आहे. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.

मॅच फिक्सिंगच्या पुष्टीनंतर आता भारत आणि इंग्लंडच्या क्रिकेट विश्वास खळबळ उडाली होती. २०११ साली लॉर्डसवर भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी झाली होती. ही कसोटी फिक्स असल्याची माहिती अनिल मुनव्वर या फिक्सरनं दिली आहे. अनिल मुनव्वर हा आयसीसीच्या रडारवर होता. त्याची चौकशी केल्यानंतर त्यानं ही धक्कादायक कबुली दिली आहे. दरम्यान, त्याच्या या कबुलीनं सारं क्रिकेट विश्व हादरून गेलं आहे. अनिल मुनव्वरनं ६ कसोटी, ६ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामन्यात फिक्सिंग केली होती. त्यामध्ये २०११ साली लॉर्डसमध्ये खेळलेल्या भारत – इंग्लंड कसोटीचा देखील समावेश आहे. अल जजीरा या वृत्तवाहिनीनं क्रिकेट मॅच फिक्सर्स : द मुनव्वर फाइल्स ही शॉर्ट फिल्म जारी केली आहे. त्यामध्ये हा दावा करण्यात आला आहे. यामध्ये इंग्लंडच्या खेळाडूंनी ७, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी ५ , पाकिस्तानच्या खेळाडूंनी ३ सामन्यात फिक्सिंग केल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये साऊथआफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान २०११ साली खेळल्या गेलेल्या केप टाऊन कसोटीचाही समावेश आहे.

आयसीसी करणार चौकशी

दरम्यान, आयसीसीने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल आहे. त्यामुळे आयसीसी या साऱ्या प्रकरणाची चौकशी करणार हे नक्की झाले आहे. शॉर्ट फिल्मच्या आधारे ही चौकशी केली जाणार आहे. सध्या क्रिकेटविश्वामध्ये फिक्सिंगचे वारे देखील मोठ्या प्रमाणावर वाहत आहेत. त्यात आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी सर्वाधिक बुकी हे भारतातील असल्याचा दावा केला आहे.

- Advertisement -

यापूर्वी मॅच फिक्सिंगचे अनेक आरोप हे विविध देशातील खेळाडूंवर झाले आहेत. त्यामुळे काहींना क्रिकेट खेळण्यापासून आजीवन बंदी देखील घातली गेली आहे. आयपीएलमध्ये देखील फिक्सिंगचे वारे वाहताना दिसले. त्यामुळे श्रीशांत सारख्या खेळाडूवर बंदी देखील घातली गेली. परिणामी या नव्या आरोपानं आता खळबळ उडाली आहे. त्यामुळे चौकशीअंती नेमकं कुणाकुणाची नावं बाहेर येतात हे पाहावं लागणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -