घरक्रीडा३३ साल बाद: विराट-कपिल देवचा ऑस्ट्रेलियाला एकाच दिवशी फॉलो ऑन

३३ साल बाद: विराट-कपिल देवचा ऑस्ट्रेलियाला एकाच दिवशी फॉलो ऑन

Subscribe

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान सध्या कसोटी मालिका चालू आहे. चौथ्या कसोटीच्या आज चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलो ऑन देण्याची किमया साधली आणि अनेक विक्रमांची नोंद केली. ३३ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे ६ जानेवारी रोजी तत्कालीन कर्णधार कपिल देव याच्या नेतृत्वाखाली याच सिडनीच्या मैदानात ऑस्ट्रेलियाला फॉलो ऑन मिळाला होता. १९८६ साली याच दिवशी फॉलो ऑन दिल्यामुळे आज एका योगायोगाची पुर्नवृत्ती पाहायला मिळाली.

भारताची मजबूत आघाडी

चौथ्या कसोटीमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना भारताने मजबूत अशी आघाडी घेतली होती. पुजारा १९३, ऋिषभ पंत १५९ आणि जाडेजा ८१ या तिघांच्या खेळीवर भारताने ६२२ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर उभे केले होते. याचा पाठलाग करत असताना ऑस्ट्रेलियाचा पुर्ण संघ ३०० धावांवर बाद झाला. कुलदीप यादव याने सर्वाधिक ५ बळी घेऊन त्याच्याही नावावर ऑस्ट्रेलियात त्यांच्याविरोधात पाच बळी घेण्याचा नवा विक्रम स्वतःच्या नावावर केला.

- Advertisement -

… तेव्हा विराट जन्मलाही नव्हता

विशेष म्हणजे कपिल देव यांनी ६ जानेवारी १९८६ रोजी हा विक्रम केला तेव्हा विराट कोहलीचा जन्मही झाला नव्हता. १९८६ च्या कसोटीत भारताने पहिल्यांदा बॅटिंग करत असताना चार विकेट्स गमावून ६०० धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ ३९६ धावांवर सर्वबाद झाला. कपिल देव याने कसोटीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ६ जानेवारी रोजी ऑस्ट्रेलिया संघाला फॉलो ऑन दिला. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने सहा विकेट्स गमावून ११९ धावा केल्या. त्यामुळे ही कसोटी अनिर्णित राहिली होती.

३३ वर्षांनंतर विराट कोहलीच्या संघाने अगदी तसाच विक्रम केलेला आहे. मात्र यावेळी त्याच्या हातात एक दिवस आहे. त्यामुळे ही कसोटी आणि मालिका जिंकण्याची संधी भारताकडे आहे. आज चौथा दिवस पावसामुळे वाया गेल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या मदतीला पाऊस धावून आला, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -