ईशांत शर्माचे 5 बळी

भारत वि.वेस्ट इंडिज कसोटी मालिका

Mumbai
Ishant Sharma

अ‍ॅण्टिग्वा येथे सुरू असलेल्या भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजचा पहिला डाव 222 धावांवर आटोपला.भारतीय संघाचा पहिला डाव 297 धावांत संपला होता.त्यामुळे भारतीय संघाला 75 धावांची आघाडी मिळाली आहे. भारताकडून ईशांत शर्माने आक्रमक गोलंदाजी करत वेस्ट इंडीजच्या 5 खेळाडूंना माघारी धाडले.शमी आणि जडेजाला प्रत्येकी 2 तर बुमराहला एक विकेट घेण्यात यश आले. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसने सर्वाधिक 48 धावा केल्या.

जेटलींना श्रद्धांजली

वेस्ट इंडिजमध्ये कसोटी सामना खेळत असलेला भारतीय संघाने माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. जेटलींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संघ काळ्या फीत लावून मैदानात उतरला. अरुण जेटलींच्या निधनाच्या बातमीने खूप दू:ख झाले. तसेच जेव्हा दिल्लीतील क्रिकेटपटूंकडे दुर्लक्ष केले जात होते तेव्हा अरुण जेटलींनी दिल्लीतील क्रिकेटपटूंकडे दुर्लक्ष होण्याचे कारण ऐकून घेत अनेक क्रिकेटपटूंच्या समस्या देखील त्यांनी सोडविल्या. त्यानंतर अनेक दिल्लीतील क्रिकेटपटूंना भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यामुळे हे सर्व जेटलींमुळेच शक्य झाल्याचे विरेंद्र सेहवागने म्हटले आहे.

विडिंजबरोबर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात अष्टपैलू रविंद्र जाडेजाने दुसर्‍या दिवशी अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपताना जडेजाने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना फलंदाजी करताना माझे सर्व लक्ष भागिदारी करण्यावर होते. फलंदाजीवेळी मी थोडा घाबरलो होतो. पण माझे १०० टक्के देण्याचा प्रयत्न करत होतो.कर्णधार विराट कोहलीचा विश्वास मी सार्थ ठरवला आहे. ज्यावेळी कर्णधार तुम्हाला ११ मध्ये संधी देतो, त्यावेळी तो तुमच्याकडे मुख्य खेळाडू म्हणून पाहत असतो,असे जडेजा म्हणाला.