ए बी डिव्हिलियर्सने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती

abd
ए बी डिव्हीलियर्स

ट्विटर अकॉउंट वरून केले जाहीर

दक्षिण आफ्रिकेचा माजी कप्तान आणि फलंदाज ए बी डिव्हिलियर्सने क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून निवृत्त होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या ट्विटर अकॉऊंट वरून त्याने ही माहिती दिली आहे. “I have made a big decision today,” असे लिहीत एका व्हिडिओद्वारे एबीने आपली निवृत्ती जाहीर केली आहे.
या व्हिडिओत बोलताना त्याने सांगितले की मी आता थकलो आहे आणि इतर नवीन खेळाडूंना संधी मिळावी यासाठी मी हा निर्णय घेत आहे. एबीने २००४ मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून खेळायला सुरुवात केली होती. १४ वर्षांच्या करियरमध्ये त्याने आपल्या उत्कृष्ट बॅटिंग आणि फिल्डिंगने क्रिकेट जगतात आपले चाहते निर्माण केले होते. त्याची अशी अनपेक्षीत निवृत्ती सर्वच क्रिकेटप्रेमींसाठी धक्कादायक बातमी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here