घरक्रीडाधोनीसारखा खेळाडू एका दिवसात घडत नाही - गांगुली

धोनीसारखा खेळाडू एका दिवसात घडत नाही – गांगुली

Subscribe

भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतवर सध्या बरीच टीका होत आहे. पंतला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सातत्याने धावा करता आलेल्या नाहीत. त्यातच तो यष्टींमागेही चुका करत आहे. त्यामुळे भारतीय चाहते सामन्यादरम्यान धोनी, धोनीचा नारा लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. या गोष्टीमुळे पंतवरील दबाव वाढत आहे, असे भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला होता. मात्र, पंतने या दबावाची सवय लावून घेतली पाहिजे, असे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला वाटते. तसेच पंतकडून धोनीसारख्या कामगिरीची अपेक्षा करणे चुकीचे आहे, असेही गांगुली म्हणाला.

पंतने चुका केल्यावर चाहते ’धोनी, धोनी’चा नारा लावतात ही गोष्ट त्याच्यासाठी चांगली आहे. पंतने याची सवय लावून घेतली पाहिजे. त्याच्यावर नक्कीच दबाव आहे, पण त्याला वेळ दिला पाहिजे. दबाव कसा हाताळायचा आणि यश कसे मिळवायचे, हे पंतने स्वतःच शोधले पाहिजे. मात्र, त्याची आणि धोनीची तुलना करणे योग्य नाही.

- Advertisement -

धोनीसारखा खेळाडू एका दिवसात घडत नाही. पंतला धोनीइतके यश मिळवण्यासाठी पुढील १५ वर्षे सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. धोनीने भारतीय क्रिकेटला जे योगदान दिले आहे, त्यासाठी बीसीसीआयने त्याचे आभार मानावे तितके कमी आहेत. धोनीच्या भविष्याबाबतचा निर्णय आम्ही योग्यवेळी घेऊ, असे गांगुलीने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -