घरक्रीडाधावा वाचवा, सामने जिंका!

धावा वाचवा, सामने जिंका!

Subscribe

गावस्करांच्या मते भारताच्या क्षेत्ररक्षणात सुधारणा गरजेची

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने क्षेत्ररक्षणात बर्‍याच चुका केल्या. त्यांनी हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात पाच, तर तिरुअनंतपुरम येथे झालेल्या दुसर्‍या सामन्यात तीन झेल सोडले. तसेच भारताच्या क्षेत्ररक्षकांना चपळता दाखवून धावा वाचवण्यातही अपयश आले. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणात सुधारणा गरजेची आहे, असे भारताचे महान फलंदाज सुनील गावस्करांना वाटते.

क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही क्षेत्ररक्षणात केलेल्या चुका तुम्हाला महागात पडण्याची शक्यता असते. तुम्ही धावा वाचवल्यात, तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव येतो. भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. मात्र, त्यांच्या क्षेत्ररक्षणात सुधारणा झाली पाहिजे. त्यांनी झेल पकडले, धावा वाचवल्या, तर त्यांना सामने जिंकणे थोडे सोपे होईल, असे गावस्कर म्हणाले.

- Advertisement -

भारतीय संघाने मागील काही वर्षांत आपल्या क्षेत्ररक्षणाचा स्तर खूप उंचावला आहे. मात्र, विंडीजविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांत भारताला चांगले क्षेत्ररक्षण करता आले नाही. याविषयी दुसर्‍या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली म्हणाला की, आम्ही जर इतके खराब क्षेत्ररक्षण केले, तर कितीही धावा कमीच पडतील. टी-२० सामन्याच्या एकाच षटकात तुम्ही दोन झेल सोडलेत, तर तो सामना जिंकणे तुम्हाला जवळपास अशक्यच होते.

टी-२०मध्ये दुसर्‍यांदा गोलंदाजी कठीण!

भारतीय संघ धावांचा पाठलाग करताना खूप यशस्वी होत आहे, पण त्यांना दुसर्‍यांदा गोलंदाजी करताना बर्‍याच अडचणी येत आहे. याविषयी गावस्करांनी सांगितले, टी-२० क्रिकेटमध्ये केवळ भारतालाच नाही, तर प्रत्येक संघाला दुसर्‍यांदा गोलंदाजी करताना धावा रोखणे अवघड जाते. पहिल्या टी-२० सामन्यांत विंडीजला २०७ धावाही कमी पडल्या. बरेचसे टी-२० सामने संध्याकाळी-रात्री होतात आणि त्यावेळी दव पडण्याची शक्यता असते. दव पडल्यास चेंडू ओला होता आणि गोलंदाजी करणे अवघड होते. क्षेत्ररक्षकांसाठीही ओला चेंडू पकडणे सोपे नसते. त्यामुळेच टी-२० क्रिकेटमध्ये दुसर्‍यांदा गोलंदाजी करणारे संघ फारसे यशस्वी होत नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -