घरक्रीडाअफगाणिस्तानचा पाकिस्तानला धक्का

अफगाणिस्तानचा पाकिस्तानला धक्का

Subscribe

३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरू होणार्‍या विश्वचषक स्पर्धेआधी पाकिस्तानच्या संघाला चांगलाच हादरा बसला आहे. पहिल्याच सराव सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानवर ३ गडी राखून मात केली आहे. विजयासाठी दिलेले २६३ धावांचे आव्हान अफगाणिस्तानने मधल्या फळीतील फलंदाजांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर पूर्ण केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना, पाकिस्तानने आश्वासक सुरुवात केली.

इमाम उल-हक आणि फखार झमान हे सलामीवीर संघाला अर्धशतकी मजल मारुन देत माघारी परतले. यानंतर बाबर आझमने मधल्या आणि अखेरच्या फळीतील फलंदाजांना सोबत घेत संघाला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. त्याने शतकही झळकावलं. १० चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने त्याने ११२ धावा केल्या. त्याला मधल्या फळीत शोएब मलिकने ४४ धावा करत मोलाची साथ दिली. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नाबीने ३ तर दौलत झरदान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. अफताब आलमने १ बळी घेतला.

- Advertisement -

याला उत्तर देताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी आक्रमक सुरुवात करत आपले मनसुबे स्पष्ट केले. मोहम्मद शहझाद २३ धावांवर जखमी होऊन माघारी परतला. मात्र दुसर्‍या बाजूने हजरतउल्ला झझाईने आक्रमक फटकेबाजी करत संघाला आश्वासक सुरुवात करुन दिली. अवघ्या एका धावाने त्याचे अर्धशतक हुकलं. झझाई माघारी परतल्यानंतर हशमतुल्ला शाहिदी ने संघाचा डाव सावरला. मधल्या फळीतल्या फलंदाजांना सोबत घेऊन त्याने नाबाद ७४ धावा केल्या. शेवटी राशिद खानच्या सोबतीने त्याने विजयासाठीचे लक्ष्य पूर्ण केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -