IPL 2019: फायनलमध्ये दीपिका घोष नंतर ‘ही’ तरूणी प्रकाशझोतात

मुंबई इंडियन्सची अंतिम सामना जिंकली तसे ही तरुणी ही सध्या सोशल मिडीयात अनेकांची मने जिंकत आहे

Mumbai

आयपीएल २०१९ चा अंतिम सामना हा अतिशय रोमांचकारी ठरला. या आयपीएल सामन्यात एकीकडे महेंद्र सिंग धोनी आणि रोहित शर्माकडे लक्ष वेधून घेतले तर दूसरीकडे हा सामना बघायला आलेल्या काहींनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियाच्या युगात कधी कोणाला, कोणत्या क्षणी प्रसिद्धी मिळेल याचा काही अंदाज नाही.

काही दिवसांपुर्वी आयपीएल १२ व्या सिजनमध्ये ४ मे रोजी झालेल्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर झालेल्या सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या (आरसीबी) प्रेक्षकांमध्ये बसलेली तरुणी दिपिका घोष अशीच फेमस झाली. मैदानातील कॅमेराने तिचा चेहरा कॅमेरात कैद केला आणि बंगळुरुची ही चाहती अनेकांच्या मनात घर करुन गेल्याने सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध झाली होती. आयपीएल २०१९च्या अंतिम सामन्यात प्रेक्षकांमध्ये बसलेली अशीच एक तरुणी सध्या प्रसिद्धी झोतात आली आहे.

 

View this post on Instagram

 

#RCB girl forever ❤️🏏

A post shared by deepika (@deeghose) on

मुंबई विरुद्ध चेन्नई अशा अंतिम सामन्यात मिस दिवा सुपरानॅशनल २०१८ ची विजेती आदिती हुंदिया प्रेक्षकांमध्ये बसून सामन्याचा आनंद घेत होती. या सामन्या दरम्यान कॅमेरामनने तिच्या अदा कॅमेरात कैद केल्या आणि एका रात्रीत तिला देखील प्रसिद्धी मिळाली.

मुंबई इंडियन्सची अंतिम सामना जिंकली तसे ही तरुणी ही सध्या सोशल मिडीयात अनेकांची मने जिंकत आहे. तसेच, या तरूणीचा गुगलसह इंस्टाग्राम आणि फेसबुकवर अनेक जणांनी तिचा शोध घेतला. सोशल मिडीयावर आदितीच्या ट्विटरला, फेसबुकला, इंस्टाग्रामला शोधणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

 

View this post on Instagram

 

You inspire people who pretend to not even see you , keep going 👑🌺 #💄byme

A post shared by Aditi Hundia (@aditihundia) on

आदितीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात फेमिना मिस इंडिया २०१८ या स्पर्धेपासून केली होती. त्यानंतर राजस्थान येथील मिस राजस्थान स्पर्धेतही ती सहभागी झाली होती. आदितीला २०१८ साली मिस राजस्थानचा किताब आदितीने मिळविला आहे.

 

View this post on Instagram

 

Throwback 🥀🌝 @missdivaorg @misssupranational

A post shared by Aditi Hundia (@aditihundia) on