Sunday, August 9, 2020
Mumbai
28.5 C
घर क्रीडा ऐश्वर्य तोमरचा ऑलिम्पिकमध्ये प्रवेश!

ऐश्वर्य तोमरचा ऑलिम्पिकमध्ये प्रवेश!

Mumbai

ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने रविवारी भारताला पुढील वर्षीच्या ऑलिम्पिकचे नेमबाजीतील १३ वे स्थान मिळवून दिले. त्याने दोहा येथे सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशन नेमबाजी प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. पुढील ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताच्या १३ नेमबाजांनी प्रवेश केला आहे. ही भारतीय नेमबाजांची सर्वोत्तम कामगिरी आहे. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे ११ नेमबाज, तर २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे १२ नेमबाज सहभागी झाले होते.

रविवारी झालेल्या पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकाराच्या अंतिम फेरीत ऐश्वर्यने ४४९.१ गुणांसह कांस्यपदक पटकावले. कोरियाच्या किम जॉन्गह्युनने ४५९.९ गुण मिळवत सुवर्णपदक आणि चीनच्या झोन्गहाओ झाओने ४५९.१ गुण मिळवत रौप्यपदकाची कमाई केली.

त्याआधी झालेल्या पात्रता फेरीत ऐश्वर्यने ११६८ गुण मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. चेन सिंह १७ व्या, तर पारुल कुमार २० व्या स्थानावर राहिल्याने त्यांना अंतिम फेरी गाठता आली नाही. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारात टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करणारा अनुभवी संजीव राजपूतनंतर ऐश्वर्य हा भारताचा दुसरा नेमबाज आहे.