घरक्रीडापश्चिम भारताच्या शरीरसौष्ठवाची सूत्रे अजय खानविलकरांकडे

पश्चिम भारताच्या शरीरसौष्ठवाची सूत्रे अजय खानविलकरांकडे

Subscribe

संघटनेच्या सरचिटणीसपदी निवड

भारतातील सर्वात बलाढ्य राज्य संघटना आणि जिल्हा संघटना यांचे प्रमुख पद सांभाळणार्‍या अजय खानविलकर यांची आता पश्चिम भारत शरीरसौष्ठव संघटनेच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. मुंबई आणि महाराष्ट्राला भारतातील सर्वोत्तम संघटनेचा लौकिक मिळवून देणार्‍या खानविलकरांचे पश्चिम भारतातील गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील खेळाडूंनाही पुढे आणण्याचे लक्ष्य आहे. या राज्यांमधील शरीरसौष्ठवपटूंना उत्तेजन देण्यासाठी स्पर्धा आणि शिबिरे आयोजित केली जाणार असल्याची माहिती खानविलकर यांनी दिली आहे.

त्याचप्रमाणे ज्या खेळाडूंमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्याची क्षमता आहे, अशा खेळाडूंना मार्गदर्शनाबरोबर आर्थिक मदत देण्याची योजनाही आपण लवकरच सुरू करणार आहोत. सध्या यासाठी प्राथमिक स्तरावर खेळाडूंची निवड करण्याचे काम सुरू आहे, असेही खानविलकर म्हणाले. तसेच मुंबई-महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम भारतात शरीरसौष्ठवाचा प्रसार व्हावा यासाठी ‘पश्चिम भारत श्री’ या स्पर्धेचेही आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

पश्चिम भारताच्या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्राच्या मदन कडू यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. तसेच चेतन पाठारे आणि प्रशांत आपटे हे दिग्गज सदस्य आहेत. आयोजन सचिवपदी शरद मारणे आणि राजेंद्र कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे, तर अ‍ॅड. विक्रम रोठे यांच्यावर कायदेशीर सल्लागाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -