घरक्रीडाबऱ्याच काळापासून होता निवृत्तीचा विचार सुरू - कूक

बऱ्याच काळापासून होता निवृत्तीचा विचार सुरू – कूक

Subscribe

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूक निवृत्त होणार आहे. हा निर्णय त्याने जरी आता घेतला असला तरी निवृत्तीचा विचार त्याच्या मनात मागील सहा महिन्यांपासून होता.

इंग्लंडचा फलंदाज अॅलिस्टर कूकने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयाची घोषणा केली होती. भारताविरुध्द शेवटच्या कसोटी सामन्यानंतर अॅलिस्टर कूक निवृत्त होणार आहे. पण हा निर्णय त्याने तडकाफडकी घेतलेला नाही. त्याने या निर्णयाचा नीट विचार केला आहे. मागील सहा महिने तो या निर्णयाचा विचार करत होता.

माझ्या खेळात काहीतरी कमतरता जाणवत होती 

कूक त्याच्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत म्हणाला, “मागील सहा महिन्यात मला कळत होते की मी आता निवृत्त व्हायला पाहिजे. मी मानसिक दृष्ट्या आधीपासूनच सक्षम आहे पण माझ्या खेळात आता काहीतरी कमतरता जाणवत होती. त्यामुळे पुढे खेळात राहणे योग्य ठरले नसते.”

निर्णयाची घोषणा करणे होते अवघड

” मी जो रूटला सर्वात आधी निवृत्तीच्या निर्णयाबाबत सांगितले. त्याला मी चौथ्या कसोटी आधी हे सांगितले. तर प्रशिक्षक बेलिस यांना सामन्यादरम्यान ही गोष्ट सांगितली. बाकी सर्व खेळाडूंना चौथा सामना संपल्यावर हा निर्णय सांगितला. हा निर्णय त्यांना सांगणे हे खूपच अवघड होते,” असे कूक म्हणाला.

जे करू शकत होतो ते केले 

” मी सगळ्यात प्रतिभान खेळाडू कधीच नव्हतो. पण माझ्याकडे चांगले खेळायची जिद्द होती. माझ्यामते मी जे काही करू शकत होतो ते केले. मी निवृत्ती घेतल्यानंतर मला अनेक क्रिकेटरनी मला शुभेच्छाही दिल्या. यातच सारे काही आले. आता या शेवटच्या सामन्यात चांगले प्रदर्शन करणे हे एकच ध्येय माझ्यासमोर आहे.”
अॅलिस्टर कूकने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयाची घोषणा केली होती.

- Advertisement -

वाचा – इंग्लंडचा महान बॅट्समन अॅलिस्टर कूक होणार निवृत्त !

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -