घरक्रीडाअखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा

अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा

Subscribe

सोमवारपासून गोवा येथे सुरू होणार्‍या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत नाशिकच्या तिडके कॉलनी येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलचा फुटबॉल संघ सहभाग घेणार आहे. चार वर्षांपूर्वी रायन इंटरनॅशनल ग्रुपचे चेयरमन डॉ. ऑगस्तीन पिंटो यांच्या पुढाकाराने या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत रायन इंटरनॅशनल संस्थेच्या अंतर्गत असलेल्या संपूर्ण भारतातील शाळा भाग घेतात. यंदा या स्पर्धेचे चौथे पर्व असून २२ एप्रिलपासून सुरू होणारी ही स्पर्धा २८ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

या स्पर्धेत नाशिकच्या सेंट फ्रान्सिस हायस्कूलचा फुटबॉल संघ सहभाग घेणार असून, या संघात श्रयेश पवार, आर्यन गीते, आशिष गायकवाड, कौशल पाटील, धैर्य अगरवाल, रुद्र बागुल, परब डोंगरे, सिद्धांत सोनावणे, आराध्य खैरे, अथर्व भोये, केतन पवार, रजत केंगे, प्रथमेश ठाकूर आणि अश्विन फुला या खेळाडूंचा समावेश आहे.

- Advertisement -

या संघाचे प्रशिक्षक म्हणून क्रीडा प्रशिक्षक विक्रम दुधारे काम बघणार आहेत. या शाळेच्या मुख्याध्यापिका कुसुमा शेट्टी यांना आपल्या शाळेचा संघ या राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करेल, असा विश्वास आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -