मुंबई बंदरची तुतीकोरम पोर्टवर मात

Mumbai
अखिल भारतीय मेजर पोर्ट व्हॉलीबॉल स्पर्धा

मुंबई मेजर पोर्ट कौन्सिल बोर्डच्या विद्यमाने सुरु असलेल्या अखिल भारतीय मेजर पोर्ट व्हॉलीबॉल स्पर्धेत मुंबई बंदरने आपली आगेकूच सुरू ठेवली. तसेच मार्मागोवा पोर्टने दोन पराभवानंतर पहिल्या विजयाची नोंद केली.

वडाळा येथे सुरू असलेल्या स्पर्धेचा दुसर्‍या दिवशी यजमान मुंबई बंदरने ब गटात तुतीकोरम पोर्टचा २८-२६, २५-१७, २५-२१ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. हा मुंबईचा साखळीतील दुसरा विजय होता. या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये तुतीकोरमने मुंबई बंदरला चांगली लढत दिली. मात्र, मुंबईने हा सेट २८-२६ असा २ गुणांनी जिंकला. यानंतरचे सेट मात्र मुंबईने सहजपणे जिंकत हा सामनाही जिंकला. याच गटात कोलकाता पोर्टने मार्मागोवा पोर्टला २५-१५, २५-०९, २५-०६ असे सहज नमवत पहिल्या विजयाची नोंद केली.

तर मार्मागोवा पोर्टचा हा दुसरा पराभव होता. तिसर्‍या सामन्यात मात्र मार्मागोवा पोर्टने चेन्नई पोर्टला २५-१६, २५-१५, २५-१५ असे पराभूत करत आपला पहिला विजय मिळवला. अ गटात पहिल्या दिवशी झालेल्या पराभवानंतर मंगलोर पोर्टने पारदीप पोर्टचा २६-२४, २५-१४, २५-२१ असा पराभव करत बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here