यावर्षी रिकाम्या स्टेडियममध्ये IPL होईल; कुंबळेला आशा

आयपीएलच्या तेराव्या हंगामाबद्दल अनिल कुंबळे आशावादी

Mumbai
anil kumble optimistic of ipl happening this year even if its without spectators
यावर्षी रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएल होईल; कुंबळेला आशा

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि किंग्ज इलेव्हन पंजाबचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना आशा आहे की यावर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आयोजित केली जाईल. कोरोनाच्या साथीमुळे प्रेक्षकांनविना स्पर्धा खेळण्याच्या निर्णयाला समर्थन दिलं आहे. मात्र, या निर्णयाबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ऑक्टोबरमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्याची इच्छा आहे. कोविड-१९ साथीमुळे स्पर्धा अजूनही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

बीसीसीआय वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येतं का याची चाचपणी करत आहे. स्टार स्पोर्ट्स ‘क्रिकेट कनेक्टेड’ मध्ये कुंबळे म्हणाला, “हो, आम्ही यावर्षी आयपीएलचे आयोजन करण्यास उत्सुक आहोत, पण त्यासाठी आम्हाला कार्यक्रम खूप व्यस्त करावा लागेल.” तो पुढे म्हणाले, “जर आम्ही प्रेक्षकांशिवाय सामने आयोजित केले तर ते तीन किंवा चार ठिकाणी आयोजित केले जाऊ शकतात. या आयोजनची शक्यता आहे. आम्ही सर्व आशावादी आहोत.”


हेही वाचा – टी-२० विश्वचषक २०२१ चं यजमानपद काढून घेऊ; आयसीसीची बीसीसीआयला धमकी


भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला की, अशा शहरांमध्ये आयपीएलचे सामने आयोजित करू शकतो जिथे सर्वाधिक स्टेडियम आहेत. यामुळे खेळाडूंना कमी प्रवास करावा लागेल. लक्ष्मण म्हणाला, यावर्षी आयपीएल स्पर्धेची शक्यता नक्कीच आहे. तीन किंवा चार मैदाने असलेली एक जागेची निवड करावी लागेल कारण प्रवास करणे खूप आव्हानात्मक असेल.”