Video : अरे बापरे! अनुष्का शर्माच्या घरात शिरला डायनोसॉर

अनुष्का शर्माला चक्क घरात दिसला डायनोसॉर.

Mumbai
anushka sharma spotted dinosaur in her house guess who patal lok web series
अनुष्का शर्मा

कोरोना व्हायरसमुळे सध्या बॉलिवूड कलाकारांसह क्रिकेटर देखील आपआपल्या घरात बंद आहेत. पण, सोशल मीडियावर मात्र, बॉलिवूड कलाकारांसह क्रिकेटर चांगलेच active झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कित्येक जण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील मागे नाहीत. हे दोघे नवनवीन व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. विशेष म्हणजे हे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी विरुष्काचा चौका मारचा मजेशीर व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर आता विराटचा आणखी एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे.

चक्क घरात दिसला डायनोसॉर

या व्हिडीओमध्ये चक्क अनुष्काला घरात डायनोसॉर फिरताना दिसतो. मात्र, हा डायनोसॉर दुसरा तिसरा कोणी नसून विराट कोहली आहे. तो डायनोसॉरची नकल करताना दिसत आहे. अनुष्का शर्माने ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत लिहीले आहे की, ‘मी घरात चक्क डायनोसॉरला पाहिले आहे. जो चालत घरात येतो. तसचे मध्येच थांबतो आणि डायनोसॉर सारखा आवाज देखील काढतो’. या व्हिडीओवर सायना नेहवालसह अनेकांनी मजेशीर कंमेट देखील दिल्या आहेत.

म्हणून पतीने घरात राहू नये

या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट दिल्या आहेत. त्यातील एकानी म्हटले आहे की, म्हणून पतीने घरात राहू नये. विराटच काय होऊन बसले आहे. तर दुसऱ्यांनी तुम्ही ‘दोघेही क्यूट आहात’, अशी कमेंट दिली आहे. तर एका युजर्सने ‘फुल मस्ती’ तर एकाने ‘हे लॉकडाऊन काय काय करायला लावणार’?, अशा एकना अनेक कमेंट दिल्या आहेत.


हेही वाचा – …म्हणून कंगनाचा ‘हा’ हॉट आणि बोल्ड फोटो होतोय व्हायरल