घरक्रीडाअर्जुन तेंडुलकरही परिधान करणार ब्लु जर्सी

अर्जुन तेंडुलकरही परिधान करणार ब्लु जर्सी

Subscribe

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला श्रीलंकेच्या आगामी दौऱ्यासाठी अंडर -१९ क्रिकेट संघात स्थान देण्यात आले आहे. मुंबई संघाच्या अंडर -१४ आणि अंडर – १६ संघात चांगली खेळी खेळल्यानंतर आगामी श्रीलंका दौऱ्यात त्याने आपली जागा निश्चित केली आहे. वडिल सचिन तेंडुलकर हे जरी उत्कृष्ट फलंदाज असले तरीही त्याचे दडपण न बाळगता अर्जुनने आपला अष्टपैलू खेळाडू म्हणून ठसा उमटवला आहे.

२७ चेंडूत ४८ धावा
सिडनी क्रिकेट ग्राउंड (एससीजी) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट ग्लोबल चॅलेंज’ स्पर्धेत अर्जुनने चांगली खेळी खेळली होती. या सामान्यात अर्जुनने २७ चेंडूत ४८ धावा काढल्या तर चार विकेट आपल्या नावावर केल्या होत्या. सिडनीच्या मैदानावर खेळण्याचा आनंद व्यक्त करताना अर्जुन याने सांगितले की, “महान फलदांज डॉन ब्रॅडमन यांच्या नाव असलेल्या मैदानावर खेळून मला अभिमान वाटत आहे.” टेस्ट सिरीजपूर्वी अर्जुनने इंग्लडच्या नेट सेशनमध्ये गोलंदाजी केली होती. आपल्या फास्ट बॉलिंगने अर्जुनने इंग्लडच्या कर्णधारांना आश्चर्यचकीत केले. या सामन्यात त्याच्या यॉर्कर लेंथ बॉलिंगचीही खुप प्रशंसा झाली.

- Advertisement -

दुखापतीमुळे त्रस्त
मागील एका वर्षापासून दुखापतीमुळे अर्जुन त्रस्त होता. मात्र अथक प्रयत्न करुन त्याने पुन्हा प्रयत्न करुन त्याने आपले सर्व लक्ष फिटनेस आणि ट्रेनिंगवर दिले. मुंबई टी-२० मधून नाव परत घेतल्याने अर्जुन हा चर्चेत आला होता. मोठी खेळी खेळवण्यासाठी सचिनने त्याला आराम मिळावा यासाठी नाव परत घेण्याआल्याची चर्चा होती.

भारतीय अंडर-१९ संघात खेळणाऱ्या खेळाडूंची नावे
दोन दिवसीय सामना- अनुज रावत (सी) (डब्ल्यूके) (डीडीसीए), अथर्व ताइडे (व्हीसीए), देवदत्त पदिककल (केएससीए), आर्यन जुल (व्हीसी) (डब्ल्यूके) (यूपीसीए), यश राठोड (वीसीए) ), आयुष बडोणी (डीडीसीए), समीर चौधरी (यूपीसीए), सिद्धार्थ देसाई (जीसीए), हर्ष त्यागी (डीडीसीए), वायडी मंगवानी (एमएचसीए), अर्जुन तेंडुलकर (एमसीए), नेहल वढेरा (पीसीए), आकाश पांडे (जीसीए), मोहित जांग्रा (यूपीसीए), पवन शाह (एमएचसीए)

- Advertisement -

एक दिवसीय सामना – आर्यन जुल (सी) (यूकेसीए), अनुज रावत (डब्ल्यूके) (डीडीसीए), देवदत्त पदिककल (केएससीए), अथर्व ताइडे (वीसीए), यश राठोड (व्हीसीए), आयुष बडोनी (डीडीसीए), समीर चौधरी (यूपीसीए) , सिद्धार्थ देसाई (जीसीए), हर्ष त्यागी (डीडीसीए), वायडी मंगवानी (एमएचसीए), अजय देवगड (एचवायडी), वाय. जयस्वाल (एमसीए), मोहित जांग्रा (यूपीसीए), आकाश पांडे (जीसीए), पवन शाह (एमएचसीए)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -