Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा अर्जुन तेंडुलकरला संधी मिळालीच; मुश्ताक अली स्पर्धेसाठी मुंबई संघात 

अर्जुन तेंडुलकरला संधी मिळालीच; मुश्ताक अली स्पर्धेसाठी मुंबई संघात 

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेला १० जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. 

Related Story

- Advertisement -

डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरची सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी मुंबईच्या संघात निवड झाली आहे. भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीसह उपयुक्त फलंदाज म्हणून ओळखला जातो. अर्जुनसह वेगवान गोलंदाज कृतिकलाही मुंबईच्या संघात स्थान मिळाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, यंदाच्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेला १० जानेवारीपासून सुरुवात होणार असून मुंबईचा गट ‘ई’मध्ये समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या २० सदस्यीय संघाची घोषणा झाली होती. मात्र, सर्व खेळाडू जैव-सुरक्षित वातावरणात असणार आहेत. त्यामुळे बीसीसीआयने २२ सदस्यीय संघ निवडण्याची परवानगी दिली होती. नेट्समध्ये गोलंदाजी करण्यासाठीही बाहेरील गोलंदाजांना परवानगी नाही. त्यामुळे मुंबईच्या संघात २१ आणि २२ वा खेळाडू म्हणून अर्जुन आणि कृतिकची निवड झाली आहे, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील सूत्रांनी सांगितले. अर्जुन आतापर्यंत मुंबईच्या विविध वयोगटांमधील संघांतून, तसेच भारताच्या १९ वर्षांखालील संघातून खेळला आहे.

- Advertisement -

मुंबईचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, आकर्षित गोमेल, सर्फराज खान, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शुभम रांजणे, सुजित नायक, साईराज पाटील, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मीनाद मांजरेकर, प्रथमेश डाके, अथर्व अंकोलेकर, शशांक अत्तरडे, शम्स मुलानी, हार्दिक तामोरे, आकाश पारकर, सुफियान शेख, अर्जुन तेंडुलकर आणि कृतिक. 

- Advertisement -