घरक्रीडाआशियाई बॉक्सिंग स्पर्धा

आशियाई बॉक्सिंग स्पर्धा

Subscribe

भारताचा बॉक्सर शिवा थापाने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. या विजयामुळे त्याने ६० किलो वजनी गटाच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. यंदा या स्पर्धेत पदक जिंकल्यास तो नवा विक्रम प्रस्थापित करेल. हे त्याचे चौथे पदक असेल. त्याने २०१३ मध्ये सुवर्ण, २०१५ मध्ये कांस्य आणि २०१७ मध्ये रौप्यपदक जिंकले होते. दुसरीकडे जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणार्‍या लोव्हलिना बॉर्गोहेन (६९ किलो) आणि दीपक (४९ किलो) यांनी या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

शिवा थापाने पहिल्या फेरीत कोरियाच्या किम वोन्होचा ४-१ असा पराभव केला. आता त्याचा पुढील फेरीत किर्गिस्तानच्या सीटबेक उलूशी सामना होईल. लोव्हलिना बॉर्गोहेनने उप-उपांत्यपूर्व फेरीत व्हिएतनामच्या ट्रान थी लिनवर ५-० अशी मात करत आगेकूच केली. तिचा पुढील फेरीत चिनी तैपेईच्या चेन निन-चीनशी सामना होईल. चेनने मागील वर्षी नवी दिल्लीत झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत लोव्हलिनाचा पराभव केला होता.

- Advertisement -

पुरुषांच्या ४९ किलो वजनी गटात दीपकने आपला चांगला फॉर्म कायम ठेवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उप-उपांत्यपूर्व फेरीत दीपकने श्रीलंकेच्या मुतूनाका पेडी गेडाराला ५-० असे पराभूत केले. रविवारी भारताचा आघाडीचा बॉक्सर अमित पंघाल या स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळणार आहे. तसेच रविवारी आशिष (६९ किलो) आणि ब्रिजेश यादव (८१ किलो) यांचेही सामने होणार आहेत.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -