घरक्रीडाAsian Games 2018 : अपूर्वी चंदेला आणि रवी कुमारने पटकावले कांस्यपदक

Asian Games 2018 : अपूर्वी चंदेला आणि रवी कुमारने पटकावले कांस्यपदक

Subscribe

आशिया गेम्स २०१८ मध्ये भारताने पहिले पदक पटकावले आहे. १० मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताची अपूर्वी चंदेला आणि रवीकुमार यांनी कांस्य पदक पटकावले आहे.

इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेबांग येथे १८ व्या आशियाई खेळांना सुरूवात झाली असून भारताने पहिले पदक आपल्या नावे केले आहे. १० मी. एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार जोडीने कांस्य पदकाची कमाई केली असून दुसरीकडे भारतीय महिला कबड्डी संघाने आपल्या पहिल्या सामन्यात जपानवर उत्कृष्ठ मात करत स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदविला आहे.

- Advertisement -

अपूर्वी चंदेला आणि रवीकुमार ही जोडी अंतिम फेरीत दाखल

भारताची अपूर्वी चंदेला आणि रवीकुमार ही जोडी १० मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचली आहे. भारतीय संघानं ८३५.३ पॉइंट्स मिळवले. ज्यात रवी कुमारने ४२० आणि अपूर्वीने ४१५.३ पॉइंट्स मिळवले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -