घरक्रीडाAsian Games 2018 : भारताच्या दीपक कुमारला रौप्यपदक

Asian Games 2018 : भारताच्या दीपक कुमारला रौप्यपदक

Subscribe

भारताला बजरंगने सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर आता दीपक कुमारने १० मी. एअर रायफल प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिले आहे.

इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेबांग येथे १८ व्या आशियाई खेळांना सुरूवात झाली असून भारताने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. सर्वात आधी १० मी. एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार जोडीने कांस्य पदकाची कमाई केली ज्यानंतर भारताचा कुस्तीपटू बजरंगने सुवर्णपदक मिळवल्यानंतर आता नेमबाज दीपक कुमारने रौप्यपदकाची कमाई केली आहे.


दीपकने भारताला १० मी. एअर रायफल प्रकारात अप्रतिम कामगिरी करत एकूण २४७.७ गुणांची कमाई केली आणि भारताला रौप्यपदक मिळवून दिले आहे. तर दुसरीकडे भारताच्या रवी कुमारला मात्र चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.

- Advertisement -
asia games 2018
सौजन्य – टाईम्स ऑफ इंडिया

१० मी. एअर रायफल प्रकारातील मिक्स्ड स्पर्धेतही भारताच्या अपूर्वी चंदेला आणि रवी कुमार या जोडीने कांस्य पदकाची कमाई केली होती.

TOI
सौजन्य – टाईम्स ऑफ इंडिया

वाचा – Asian Games 2018 : बजरंग पुनियाने पटकाविले पहिले सुवर्णपदक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -