Asian Games 2018 : भारतीय हॉकीचा इंडोनेशियावर धडाकेबाज विजय

एशियन्स गेम्समध्ये भारताच्या पुरूष हॉकी संघांनी आपली अप्रतिम कामगिरी सुरूच ठेवली असून पुरूष संघाने तब्बल १७-० च्या फरकाने इंडोनेशियाचा पराभव केला आहे.

Mumbai
india vs indonesia
भारत विरूद्ध इंडोनेशिया

इंडोनेशियात सुरू असलेल्या Asian Games 2018 मध्ये भारताच्या पुरूष संघाने अप्रतिम कामगिरी करत तब्बल १७-० च्या फरकाने इंडोनेशियाचा पराभव केला आहे. भारताच्या या विजयाने स्पर्धेतील भारताचे स्थान जास्त भक्कम झाले आहे.

पुरूष संघाचा ऐतिहासिक विजय

भारताच्या पुरूष हॉकी संघाने इंडोनेशियाच्या होम-ग्राउंडवर त्यांना तब्बल १७-० च्या फरकाने नमवत एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे आशियाई गेम्समधील हा भारताचा सर्वात मोठ्या फरकाचा विजय ठरला आहे. भारताने सुरूवातीपासूनच सामन्यावर आपले वर्चस्व कायम ठेवले होते. सामन्याच्या पहिल्या मिनीटापासूनच भारताने आक्रमक खेळ सुरू केला. सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या मिनिटाला रुपिंदरने गोल करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दिलप्रीत, मनदीप आणि सिम्रनजीतने ३, आकाशदीपने २ आणि सुनील,विवेक,अमित,हरमनप्रीत यांनी प्रत्येकी १-१ गोल केला आहे.