Asian Games 2018 : महिला कबड्डी संघाची विजयी सलामी

आशिया गेम्स २०१८ मध्ये आपल्या पहिल्याच सामन्यात भारताच्या महिला संघाने जपानवर मात करत विजयी सुरूवात केली आहे.

Mumbai
ndtv sports
सौजन्य - एनडीटीव्ही स्पोर्ट्स

इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेबांग येथे १८ वे आशियाई खेळांना सुरूवात झाली आहे. आशियातील ४५ देश या स्पर्धेत सामील झाले असून १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने आपल्या पहिल्या सामन्यात जपानवर उत्कृष्ठ मात करत स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदविला आहे.


सामन्याच्या सुरूवातीपासूनच भारताने आपले वर्चस्व कायम ठेवत अप्रतिम खेळ दाखवला. पहिल्या सत्रात भारताकडून आक्रमक खेळ दाखवला गेला. मात्र जपानने हा अप्रतिम बचाव करत सामन्यात चांगली लढत दिली. मात्र भारताच्या साक्षी कुमार आणि पायल चौधरी यांच्या अप्रतिम बचावामुळे भारताने पहिल्या सत्रात जपानला सर्वबाद करत भारतीय १९-८ अशी आघाडी घेतली. याआघाडीनंतर भारताने दुसऱ्या सत्रात आपला खेळ आणखीणच उचांवत सामन्यात जपानवर ४३-१२ अशा उत्कृष्ठ फरकाने विजय मिळवत स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. भारताकडून सोनाली शिंगटे, पायल चौधरी, साक्षी कुमार यांनी अप्रतिम खेळ दाखवला आहे.