घरक्रीडाAsian games 2018: स्क्वॉशमध्ये भारतीय महिलांना रौप्यपदक

Asian games 2018: स्क्वॉशमध्ये भारतीय महिलांना रौप्यपदक

Subscribe

भारतीय भारतीय महिलांना स्क्वॉशमध्ये रौप्यपदक मिळाले असून अंतिम फेरीत भारताला हाँग काँगकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.

इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशिया गेम्समध्ये भारतीय महिलांना अंतिम फेरीत भारताला हाँग काँगकडून पराभव स्वीकारावा लागला असल्याने भारतीयांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. भारताने यावर्षी आशिया गेम्समध्ये आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. भारतीय स्क्वॉश महिला संघाने सेमी फायनलमध्ये मलेशियाचा पराभव केल्यानंतर त्यांच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात होती. मात्र हाँग काँग च्या महिला संघाने भारताला पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावे केल आहे.

सामन्याच्या सुरूवातीपासूनच भारतीय महिलांनी आपला खेल उंचावण्याचा प्रयत्न केला. भारताकडून दिपीका पल्लीकल, जोश्ना चिनप्पा, सुनयना कुरुविल्ला आणि तन्वी खन्ना या सर्वांनीच उत्तम खेळ दाखवला मात्र हाँग काँगच्या जबरदस्त खेळापुढे भारताला २-० च्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

- Advertisement -

क्रिडामंत्री राज्यवर्धन यांनीही केले अभिनंदन

भारतीय महिलांच्या स्क्वॉशमधील अप्रतिम कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. भारताचे क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून भारताच्या महिला स्क्वॉश संघाचे अभिनंदन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -