Asian Games 2018 : संजीव राजपूतने पटकावले रौप्यपदक

एशियन गेम २०१८ मध्ये भारताचा नेमबाजपटू संजीव राजपूतने ५० मी. रायफल थ्री पोजीशनमध्ये प्रकारात अप्रतिम खेळ करत रौप्यपदक आपल्या नावे केले आहे.

Mumbai
sanjeev rajput
सौजन्य - हिंदुस्तान टाईम्स

इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेबांग येथे सुरू असलेल्या १८ व्या आशियाई खेळांत भारताच्या नेमबाजपटूींनी आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली असून आता यातच भर टाकत नेमबाजपटू संजीव राजपूतने ५० मी. रायफल थ्री पोजीशनमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिले आहे.

वाचा – Asian Games 2018 : नेमबाजपटू लक्ष्य शेरॉनने पटकावले रौप्यपदक

५ गुणांनी हुकलं सुवर्णपदक

संजीवलाही अवघ्या ५ गुणांनी सुवर्णपदकाला हुकावे लागले असून त्याने ३२५.४ गुणांसह रौप्यपदक पटकावले असून थायलंडच्या टोर्टुंगपॅनिचने ३३०.८ गुणांसह सुवर्णपदक मिळवले आहे.

भारतीय नेमबाजांची स्पर्धेत आतापर्यंत उत्कृष्ठ कामगिरी   

भारतीय नेमबाजांनी एशियन गेम्समध्ये आतापर्यंत भारताला मिळवून दिलेल हे सहावं पदक आहे. सर्वात आधी पहिल्या दिवशी अपुर्वी चंदेला-रवी कुमार जोडीने १० मी. एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिपक कुमारने १० मी. एअर रायफल प्रकारात रौप्यपदक मिळवून दिला. यानंतर ट्रॅप नेमबाजी प्रकारात भारताच्या लक्ष्य शेरॉनने रौप्य पदक मिळवून दिला. यानंतर आज सकाळी १६ वर्षीय सौैरभने १० मीटर एयर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक तर अभिषेक वर्मानेही कांस्यपदकाची कमाई केली आहे. अशाप्रकारे भारतीय नेमबाजांनी एशियन गेम्समध्ये भारताला आतापर्यंत ६ पदक मिळवून दिली आहेत.

वाचा – Asian Games 2018 : सौरभ चौधरीची सुवर्ण कामगिरी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here