घरक्रीडाAsian Games 2018: विनेश फोगाटने केली सुवर्ण पदकाची कमाई

Asian Games 2018: विनेश फोगाटने केली सुवर्ण पदकाची कमाई

Subscribe

एशियन्स गेम २०१८मध्ये भारताने दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. विनेश फोगाटनं फ्री स्टाईल कुस्ती प्रकाराच्या ५० किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

Asian Games 2018 मध्ये भारतानं दुसऱ्या सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. विनेश फोगाटनं महिला कुस्तीमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. विनेशनं फ्री स्टाईल कुस्ती प्रकारामध्ये ५० किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदकाची केली आहे. विनेशनं जपानच्या स्पर्धकाचा पराभव केला आहे. यापूर्वी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बजरंग पुनियानं देखील कुस्तीच्या ६५ किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदकाची कमाऊ केली होती. बजरंगनं जपानच्या दाईची ताकातानी याला ११-८नं पराभव केला होता.

पहिल्या दिवशी भारताची उत्तम कामगिरी

Asian Games 2018 च्या पहिल्याच दिवशी कुस्तीपटू बजरंगने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच १० मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत भारताला अपूर्वी चंदेला आणि रवीकुमार या जोडीने कांस्य पदक मिळवून दिले आहे.

वाचा – Asian Games 2018 : बजरंग पुनियाने पटकाविले पहिले सुवर्णपदक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -