घरक्रीडाAsian Games 2018 : अवघ्या ०.०१ सेकंदाने हुकले पदक

Asian Games 2018 : अवघ्या ०.०१ सेकंदाने हुकले पदक

Subscribe

जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. परंतु भारताला ज्या अनुभवी वीरधवल खाडेकडून अपेक्षा होत्या त्याचा भंग झाला आहे. अवघ्या ०.०१ सेकंदांनी त्याचे पदक हुकले आहे.

एक सेकंद आपल्यासाठी किती लहान असतो. शिवाय ०.१ सेकंद म्हणजे आपल्यासाठी जवळजवळ शून्यच. परंतु ०.१ सेकंदाची (बोलीभाषेत त्याला १ मिलीसेकंद देखील म्हणतात) किंमत काय असते हे आज आपल्या देशाने पाहिले. भारताचा स्टार स्वीमर वीरधवल खाडे याने ०.०१ सेकंदामुळे आशियाई क्रीडा स्पर्धांमधले पदक गमावले आहे. ५० मीटर पोहण्याच्या स्पर्धेत वरीधवल खाडे चौथा आला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या शुनिची नकाओ या स्वीमरने ५० मीटर अंतर पोहण्यासाठी २२.४६ सेकंद लागले तर हेच अंतर पार करण्यासाठी वीरधवलला २२.४७ सेकंद लागले. त्यामुळे अवघा ०.०१ सेकंद वीरधवलला महागात पडला आहे.

असा झाला थरारक सामना

आज दुपारी महाराष्ट्राचा खेळाडू वीरधवल खाडेची स्पर्धा होती. या स्पर्धेकडे भारताचे लक्ष लागले होते. अनुभवी वीरधवलकडून भारताला पदकाची अपेक्षा होती. परंतु वीरधवलला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या अंतिम फेरीसाठी ८ खेळाडुंची निवड झाली होती. आठही खेळाडुंनी ५० मीटर अंतर पार करण्यासाठी केवळ २२ सेकंद इतका वेळ घेतला. चीनच्या यू हेक्झीनने या सामन्यात सुवर्णपदक मिळवले. त्याने ५० मीटर अंतर पार करण्यासाठी २२.११ सेकंदांचा वेळ घेतला. तर जपानच्या कात्सुमा नाकामुरा याने हेच अंतर पार करण्यासाठी २२.२० सेकंदांची वेळ नोंदवली.

- Advertisement -
scoreboard
स्कोरबोर्ड

पदकतालिकेत भारत ६व्या स्थानावर

दरम्यान १८ ऑगस्टपासून इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ धूमधडाक्यात सुरु झाल्या. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह ९ पदकांची कमाई केली आहे. पदकतालिकेत भारत सध्या इराणसह संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -