वीरधवल खाडेचे पदक थोडक्यात चुकले

वीरधवलने पात्रता फेरीत २२.४३ सेकंदांचा वेळ घेत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र अंतिम फेरीत सेकंदाच्या शंभराव्या भागाच्या फरकाने वीरधवलचे एशियाडमधील दुसरे पदक चुकले. याआधी त्याने २०१० साली झालेल्या एशियाडमध्ये कांस्य पदक पटकावले होते.

Mumbai
virdhawal Khade
वीरधवल खाडे

एशियाडमध्ये भारताच्या वीरधवल खाडेचे ५० मीटर फ्री स्टाइल स्विमींग स्पर्धेतील पदक अवघ्या ०.०१ सेकंदाने चुकले. ५० मीटरचे अंतर कापण्यासाठी वीरधवलने २२.४७ सेकंदांचा वेळ घेतला तर कांस्य पदक जिंकणार्‍या जपानच्या सुनिची नाकाओने २२.४६ सेकंदांचा वेळ लावला. या स्पर्धेची सुरूवात वीरधवलने अप्रतिम केली. स्पर्धेच्या पात्रता फेरीत त्याने स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला होता. वीरधवलने पात्रता फेरीत २२.४३ सेकंदांचा वेळ घेत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र अंतिम फेरीत सेकंदाच्या शंभराव्या भागाच्या फरकाने वीरधवलचे एशियाडमधील दुसरे पदक चुकले. याआधी त्याने २०१० साली झालेल्या एशियाडमध्ये कांस्य पदक पटकावले होते. या स्पर्धेत चीनच्या यु हेक्सीनने ५० मीटर २२.११ सेकंदात पूर्ण करत सुवर्ण पदक पटकावले. तर जपानच्या कात्सुमी नाकामुरा याने २२.२० सेकंदाचा वेळ घेत रौप्य पदक मिळवले.butler and strokes
बटलर-स्टोक्सने भारताला तंगवले

बटलर-स्टोक्सने भारताला तंगवले

इंग्लंडचे फलंदाज जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांनी झुंजार फलंदाजी करत भारताला तिसर्‍या कसोटीच्या चौथ्या दिवशी विजयापासून दूर ठेवले. भारताने इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी चौथ्या डावात ५२१ धावांचे आव्हान दिले होते. चौथ्या दिवसाची सुरूवात बिनबाद २३ वरून करणार्‍या इंग्लंडने पहिल्याच सत्रात ४ गडी गमावले. दिवसाच्या सुरूवातीच्या २ षटकांत इशांत शर्माने इंग्लंडचे सलामीवीर किटन जेनिंग्स आणि अ‍ॅलिस्टर कुक यांना माघारी पाठवले. त्यानंतर कर्णधार जो रूट आणि ऑली पोप यांनी काही काळ चांगला खेळ केला. मात्र, हे दोघे लागोपाठच्या षटकांत बाद झाले तेव्हा इंग्लंडची अवस्था ४ बाद ६२ अशी होती. दुखापतीमुळे यष्टीरक्षक जॉनी बेरस्टोव फलंदाजीला आला नाही. त्यामुळे जोस बटलर आणि अष्टपैलू बेन स्टोक्सवर इंग्लंडचा डाव सावरण्याची जबाबदारी होती. या दोघांनीही अत्यंत संयमाने खेळ करत भारताला विकेट घेण्याची संधी दिली नाही.

दरम्यान जोस बटलरने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. तर कोर्ट केसनंतर पुनरागमन करणार्‍या स्टोक्सने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे चौथ्या डावात ८० षटकांनंतर इंग्लंडचा स्कोर ४ बाद २२३ असा होता. सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला २९८ धावा तर भारताला ६ बळींची गरज आहे. इंग्लंडला ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने या सामन्याचा पाचवा दिवस अत्यंत महत्वाचा आहे.