घरक्रीडाAsian Shooting Championships : मनू-सौरभने पटकावले सुवर्णपदक

Asian Shooting Championships : मनू-सौरभने पटकावले सुवर्णपदक

Subscribe

भारताचे युवा नेमबाज मनू भाकर आणि सौरभ चौधरी या दोघांनी मिळून आशियाई एअरगन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

भारताचे युवा नेमबाज मनू भाकर आणि सौरभ चौधरी या दोघांनी मिळून आशियाई एअरगन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. या दोघांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात ज्युनियर स्तरावरील विश्वविक्रमी कामगिरी करत हे सुवर्णपदक पटकावले.

विश्वविक्रमी ४८५.४ गुणांची कमाई

मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत विश्वविक्रमी ४८५.४ गुणांची कमाई करत सुवर्णपदक पटकावले. तर चीनच्या वांग झियाओयू आणि हाँग शुक्वी या जोडीने ४७७.९ गुणांसह रौप्यपदक कमावले. या स्पर्धेत चीनच्या जोडीनेच कांस्यपदक मिळवले. तर भारतीय जोडी अभिज्ञा पाटील आणि अनमोल जैन यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -