घरक्रीडाIND VS AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचा पहिला बळी

IND VS AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचा पहिला बळी

Subscribe

आजच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून भारताला ऐतिहासिक मालिका जिंकण्याची संधी असणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील आज तिसरा अर्थात शेवटचा सामना खेळला जात आहे. भारतीय वेळेप्रमाणे आज सकाळी मेलबर्न येथे सुरु झालेल्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय निर्माण झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे भारत वि. ऑस्ट्रेलियाचा हा सामना सध्या थांबला होता. मात्र, पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली असून भारतीय संघ गोलंदाजी करत आहे. दरम्यान, सामन्यात ऑस्ट्रलियाचा पहिला बळी गेला आहे. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या कॅरेचा झेल घेत, त्याला ४ धावांवर बाद केलं आहे.

सामन्यापूर्वी भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. IND VS AUS मध्ये सुरु झालेल्या या मालिकेमध्ये प

‘आर या पार’ स्थिती…

दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघासाठी त्यांच्या होमग्राउंडवर हा सामना जिंकणं महत्वाचं ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाने होमग्राउंडवर याआधी मागील २ मालिका गमावल्या आहेत. त्यांना इंग्लंडकडून ४-१ आणि दक्षिण आफ्रिकेकडून २-१ ने पराभव झाला आहे. आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने संघात २ बदल करत, नथन लायनच्या जागी अॅडम झॅम्पा तर जेसन बेहरनडॉर्फच्या जागी बिली स्टॅनलेकला स्थान दिले आहे.
दुसरीकडे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली तसंच रोहित शर्मा, धोनी आणि दिनेश कार्तिक हे खेळाडू फॉर्मात आहेत. आजच्या सामन्यात विजय मिळवून भारताला ऐतिहासिक मालिका विजयाची संधी असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -