वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

आगामी वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. या संघातून पीटर हॅंड्सकाँब आणि जोश हेझलवूडला या खेळाडूंना वगळण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Canberra
Australia announced squad for Cricket World Cup 2019
वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

आगामी वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला आहे. ३० मे पासून इग्लंडमध्ये वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या खेळाडूंमध्ये पीटर हॅंड्सकाँब आणि जोश हेझलवूडला यांचे नावे नाहीत, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हॅंड्सकाँब आणि हेझलवूड यांच्यासोबत आणखी दोन खेळाडूंना डच्चू देण्यात आले आहे. याशिवाय चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.

‘या’ खेळाडूंना संघातून वगळण्यात आले

पीटर हॅंड्सकाँब, जोश हेझलवूड, अॅश्टन टर्नर, केन रिचर्डसन, मॅथ्यू वेड, डार्सी शॉर्ट

ऑस्ट्रेलियाचा जाहीर झालेला संघ

अॅरॉन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, अॅलेक्स केरी, नॅथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नेथन लॉयन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झॅप्पा

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here