घरक्रीडाऑस्ट्रेलियाने भारतापासून सावधान राहावे - मिताली

ऑस्ट्रेलियाने भारतापासून सावधान राहावे – मिताली

Subscribe

ऑस्ट्रेलियामध्ये होणार्‍या महिला टी-२० विश्वचषकाला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. सलामीची लढत यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत या संघांमध्ये होणार आहे. हा सामना खूपच चुरशीचा होईल, असे मत भारताच्या एकदिवसीय संघाची कर्णधार मिताली राजने केले. तसेच ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वचषक जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार आहे, पण भारत त्यांना चांगली झुंज देईल, असे तिला वाटते. युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी मितालीने मागील वर्षी टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता.

ऑस्ट्रेलिया विश्वचषक जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार आहे, पण त्यांनी भारतापासून राहण्याची गरज आहे. भारतीय संघात बर्‍याच प्रतिभावान खेळाडू आहेत आणि त्या ऑस्ट्रेलियाला झुंज देतील. या सामन्यात दोन्ही संघ मोठी धावसंख्या उभारतील असा माझा अंदाज आहे. दोन्ही संघांची फलंदाजांची फळी मजबूत आहे. ज्या देशाचे फलंदाज जास्त धावा करतील, तो देश जिंकण्याची जास्त शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाची टी-२० क्रिकेटमधील कामगिरी उत्कृष्ट असून ते इतर संघांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. त्यामुळे भारताविरुद्ध सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया जिंकण्याची जास्त शक्यता आहे, असे मितालीने सांगितले.

- Advertisement -

महिला क्रिकेटचे चित्र पूर्णपणे बदलले!
मितालीने १९९९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हा महिला क्रिकेटला फारशी लोकप्रियता नव्हती. मात्र, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सलामीच्या सामन्याची जवळपास सर्व तिकिटे विकली गेली आहेत. याविषयी मिताली म्हणाली, पूर्वी आम्ही केवळ पुरुष खेळाडूंकडून प्रेरणा घेऊ शकत होतो, कारण आम्हाला त्यांना टीव्हीवर बघण्याची संधी मिळायची. आता मात्र महिला क्रिकेटचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. या पिढीतील मुलींना महिला क्रिकेटपटूंचा आदर्श आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -