ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी BCCI ने रोहित शर्मासमोर ठेवली अट

australia tour rohit sharma wont travel to australia unless he clears a fitness test

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर आणि उपकर्णधार रोहित शर्माची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड होण्याची शक्यता आहे. रोहित शर्माला दुखापतीचे कारण देत संघातून वगळण्यात आले आहे. त्यावरुन BCCI निवड समीतीवर जोरदार टीका झाली. त्यामुळे बीसीसीआय डॅमेज कंट्रोलसाठी रोहितला संघात घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ११ नोव्हेंबरला यूएईमधून रवाना होणार आहे. मात्र, रोहित शर्मा भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाणार नाही आहे. परंतु, १७ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघात समावेश होऊ शकतो. तोपर्यंत रोहित शर्मा दुखापतीतून बरा होण्याची अपेक्षा आहे. मात्र, रोहितला संघात येण्यासाठी फिटनेस टेस्ट पूर्ण करावी लागणार आहे. जर रोहितने फिटनेस टेस्ट पूर्ण केली तरच संघात स्थान मिळाणार आहे. अन्यथा, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितचा समावेश होणार नाही आहे.

रोहित शर्माला दिलेल्या डच्चूमुळे बराच वाद निर्माण झाला. रोहित शर्मा आयपीएलसाठी फिट आहे मग ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अनफिट कसा? असा सवाल विचारला जात आहे. दरम्यान, १० नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना रंगणार आहे. मुंबईला पाचव्यांदा जेतेपद पटकावण्याची संधी आहे.