घरक्रीडाIND vs AUS : ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांचा भारतीय संघाला होईल फायदा - रमीझ राजा

IND vs AUS : ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांचा भारतीय संघाला होईल फायदा – रमीझ राजा

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलियात चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

भारतीय संघाला आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची चांगली संधी असल्याचे मत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांनी व्यक्त केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष आहे. कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून हा सामना प्रकाशझोतात (डे-नाईट) होणार आहे. भारताने मागील वर्षी ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. यंदाही भारतीय संघ विजेता ठरू शकतो असे रमीझ राजा यांना वाटते.

ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या आता पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीत. आता ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर चेंडू तितकासा उसळी घेत नाही. तसेच चेंडू फारसा स्विंगही होत नाही. आता फलंदाजांना ऑस्ट्रेलियात खेळताना खेळपट्ट्यांची भीती वाटत नाही. याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकेल. त्यातच ऑस्ट्रेलियाला कसोटी सामने पाचही दिवस चालावेत असे वाटत असेल, जेणेकरून त्यांचा आर्थिक फायदा होईल. या सर्व गोष्ट लक्षात घेता भारतीय संघाला पुन्हा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे, असे रमीझ राजा म्हणाले.

- Advertisement -

भारतीय संघाची फलंदाजांची फळी मजबूत आहे. भारताचे फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सतावू शकतात. आता भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीतही खूप सुधारणा झाली आहे. त्यांनी मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी केली होती. हे ऑस्ट्रेलियाच्या संघाला अजूनही लक्षात असेल. त्यामुळे भारतीय संघ यंदाही ऑस्ट्रेलियात यशस्वी होऊ शकेल, असेही रमीझ राजा यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -