घरक्रीडारिक्षाचालकाच्या मुलीने पटकावले सुवर्णपदक

रिक्षाचालकाच्या मुलीने पटकावले सुवर्णपदक

Subscribe

भारताची बॉक्सर संदीप कौरने पोलंड येथे झालेल्या १३ व्या आंतरराष्ट्रीय सिलेसियन बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली.

भारताची बॉक्सर संदीप कौरने पोलंड येथे झालेल्या १३ व्या आंतरराष्ट्रीय सिलेसियन बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. तिने ५२ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात पोलंडच्या कॅरोलिना अॅम्पुस्काचा ५-० असा पराभव केला. पण १६ वर्षीय संदीपचा या सुवर्ण पदकापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. तिला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

काकांकडून घेतली प्रेरणा

संदीप कौर ही पटियालाच्या हसनपूर या गावची रहिवासी आहे. संदीपचे काका बॉक्सर होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेत तिनेही बॉक्सर बनण्याचा निर्णय घेतला. तिच्या गावाजवळ असणाऱ्या एका अकादमीत तिने बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतले. संदीपचे वडील जसवीर सिंग रिक्षाचालक आहेत. तिची आर्थिक परिस्थिती तशी बेताची आहे. मात्र असे असूनही संदीपच्या वडिलांनी तिला बॉक्सिंग करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले. तिला कधीही बॉक्सिंग सोडावे लागणार नाही याची त्यांनी काळजी घेतली आणि तिनेही आपल्या खेळावर प्रचंड मेहनत घेत सुवर्ण पदकाची कमाई केली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -