घरक्रीडाश्रीकांत पहिल्याच फेरीत गारद

श्रीकांत पहिल्याच फेरीत गारद

Subscribe

बॅडमिंटन आशिया स्पर्धा

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतला बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल यांनी मात्र या स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. तसेच समीर वर्मालाही या स्पर्धेची दुसरी फेरी गाठण्यात यश आले आहे.

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत पाचव्या सीडेड किदाम्बी श्रीकांतला जागतिक क्रमवारीत ५१व्या स्थानी असलेल्या इंडोनेशियाच्या हिरेन ऋस्तोवितोने १६-२१, २०-२२ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. पहिला गेम गमावल्यानंतर दुसर्‍या गेममध्ये श्रीकांतकडे १८-१३ अशी आघाडी होती. मात्र, त्यानंतर त्याला चांगला खेळ करण्यात अपयश आले आणि त्याने हा गेम २०-२२ असा गमावला. भारताच्याच समीर वर्माने पहिल्या फेरीत जपानच्या काझूमासा साकायचा २१-१३, १७-२१, २१-१८ असा पराभव केला.

- Advertisement -

महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामना जिंकण्यासाठी पी. व्ही. सिंधूला फार मेहनत घ्यावी लागली नाही. तिने जपानच्या सयाका ताकाहाशीवर २१-१४, २१-७ अशी मात करत स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. तसेच सायना नेहवालने पहिल्या फेरीत चीनच्या हान युईला १२-२१, २१-११, २१-१७ असे पराभूत केले.

अर्जुन-रामचंद्रन जोडी पराभूत

पुरुष दुहेरीत एमआर अर्जुन आणि श्लोक रामचंद्रन ही भारताची जोडी पराभूत झाली. त्यांचा थायलंडच्या ही जिटेन्ग आणि क्वियान टॅन या जोडीने २१-१८, २१-१५ असा पराभव केला. महिला दुहेरीत जक्कमपुडी मेघना आणि पूर्वीशा राम, पूजा दांडू आणि संजना संतोष, अपर्णा बालन आणि केपी श्रुती या तीन भारतीय जोडी पराभूत झाल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -