घरक्रीडाया खेळाडूशी करणार फुलराणी सायना नेहवाल लग्न

या खेळाडूशी करणार फुलराणी सायना नेहवाल लग्न

Subscribe

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सायना बॅडमिंटनपटू पी. कश्यप याच्यासोबत येत्या १६ डिसेंबरला लग्न करणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या प्रेमाची चर्चा होती अखेर ते लग्न करणार आहे.

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अखेर विवाह बंधनात अडकणार आहे. २८ वर्षाची सायना नेहवाल येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे. सायनाचा होणारा नवरा कोण असेल हे जाणून घेण्याची तर सर्वांनाच इच्छा असेल. तर सायना नेहवाल एका खेळाडूशीच लग्न करणार आहे. बॅडमिंटनपटू पी. कश्यप (Parupalli Kashyap) याच्यासोबत सायना विवाह बंधनात अडकणार आहे. येत्या १६ डिसेंबरला सायनाचे लग्न होणार आहे. या लग्नाला जवळचेच नातेवाईक सहभागी होणार आहे. लग्नाच्या पाच दिवसानंतर म्हणजे २१ डिसेंबरला रिसेप्शन पार्टी देण्यात येणार असून त्यामध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार असल्याचे देखील कळत आहे. सायना आणि कश्यप या दोघांच्या परिवारामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे.

लपवून ठेवली होती प्रेमाची गोष्ट

सायना आणि कश्यप यांच्या प्रेमाचे चर्चे गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहेत. मात्र दोघांनी कधी याविषयावर चर्चा केली नाही. दोघांमध्ये असणाऱ्या प्रेमासंदर्भात विचारल्यावर दोघेही नकार द्यायचे. कश्यपने अनेक वेळा सायना चागली मैत्रिण आणि प्रॅक्टिस पार्टनर असल्याची गोष्ट स्विकार केली होती. दोघांच्या इंस्टाग्राम आणि सोशल मीडिया अकाऊंटवरील फोटोवरुन अनेकदा चर्चा होती की सायना नेहवाल कश्यपला डेट करत आहे. मात्र दोघांनी या प्रेमासंदर्भात सजगता ठेवल्याने आजपर्यंत कोणीच काही बोलले नव्हते.

- Advertisement -

खेळाडूशीच करणार लग्न

हैद्राबादमध्ये राहणारे दोन्ही बॅडमिंटन स्टार सायना आणि कश्यप गेल्या अनेक वर्षापासून रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यांनी ही गोष्ट लपवून ठेवण्यात ते यशस्वी झाले. पण दोघांच्या जवळच्या नातेवाईकांना ते एकमेकांना पसंत करतात हे माहिती होते. सायना-काश्यप भारतीय खेळाडूंमध्ये लग्न झालेल्यापैकी एक जोडी असणार आहे. दिपिका पल्लीकन- दिनेश कार्तिक, इशांत शर्मा- प्रतिमा सिहं,गीता फोगाट – पवन फोगाट आणि साक्षी मलिक- सत्यवर्त काडयान यांनी खेळाडूंसोबतच लग्न केले आहे.

गोपीचंद यांच्याकडून ट्रेनिंग घेताना झाली ओळख

पी. कश्यपने २०१४ मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल पटकावले होते. दोघांची भेट २००५ मध्ये झाली ज्यावेळी दोघांनी पी. गोपीचंद यांच्याकडून ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली. सायनाने आतापर्यंत २० सामने जिंकून भारतीय बॅडमिंटनमध्ये सुपरस्टार बनली आहे. तर कश्यप पुरुष बॅडमिंटन स्पर्धेमध्ये चांगला खेडाळू आहे. एकावेळी तो विश्व रॅकिंगमध्ये सहाव्या क्रमांकावर होता. आता दुखापत झाल्यामुळे कश्यप खेळापासून दूर आहे. सायना २०१४ मध्ये विमल कुमार यांच्याकडून ट्रेनिंग घेण्यासाठी बंगलुरुला शिफ्ट झाली. तेव्हा सर्वांना वाटत होते की, दोघांची रिलेशनशिफ संपली. मात्र कश्यप सायनाला भेटण्यासाठी सतत बंगळुरुला जात होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -