जागतिक कुस्ती स्पर्धेत तीन पदकं मिळवणार बजरंग पहिला भारतीय कुस्तीपटू

बजरंग पुनियाने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. मंगोलियाच्या तुलगा तुमूर ओचीरवर ८-७ ने बजरंगने मात केली.

Kazakhstan
Bajrang Punia clinches bronze in Wrestling World Championship, first Indian to win three Worlds medals

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताने जोरदार पुनरागमन केलं आहे. भारताचा अव्वल पैलवान बजरंग पुनियाने या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली आहे. ६५ किलो वजनी गटाने बजरंग कांस्यपदक मिळवलं आहे. मंगोलियाच्या तुलगा तुमूर ओचीरवर ८-७ ने बजरंगने मात केली आहे. जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचं कझाकस्तान येथील नूर सुलतानमध्ये आयोजन करण्यात आलं आहे.

विशेषतः म्हणजे बजरंग या सामन्यात सुरुवातीला ०-६ अशा पिछाडीवर होता. मात्र, बजरंग खरी कसरत दाखवून ८-७ असा विजय साजरा करत कांस्यपदक आपल्या नावे केलं. बजरंगचं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासातलं हे तिसरं पदक आहे. याआधी बजरंगने २०१३ आमि २०१८ साली या स्पर्धेत पदकं मिळवलं होतं. बजरंग हा जागतिक स्पर्धेत कुस्तीचा तीन पदकं मिळवणार पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.