घरक्रीडाबजरंगने केले पदक अमृतसर रेल्वे अपघातग्रस्तांना समर्पित

बजरंगने केले पदक अमृतसर रेल्वे अपघातग्रस्तांना समर्पित

Subscribe

भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत जिंकलेले पदक अमृतसरमध्ये रावण दहनाच्या वेळी रेल्वे अपघातातील मृत व्यक्तींना समर्पित केले आहे.

भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. हे पदक त्याने अमृतसरमध्ये रावण दहनाच्या वेळी रेल्वे अपघातातील मृत व्यक्तींना समर्पित केले आहे. शुक्रवारी झालेल्या या भीषण अपघातात ६१ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या ६५ किलो वजनी गटात बजरंगने रौप्यपदक मिळवले. त्याचा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानच्या टाकूटो ओटोगुरो याने १६-९ असा पराभव केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -