घरक्रीडातमिम इक्बालचे पुनरागमन

तमिम इक्बालचे पुनरागमन

Subscribe

भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी बांगलादेश संघ जाहीर

भारताविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी अनुभवी सलामीवीर तमिम इक्बालचे बांगलादेशच्या संघात पुनरागमन झाले आहे. तमिमने काही काळासाठी क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होते. त्याने जवळपास तीन महिन्यांपूर्वी आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तसेच डावखुरा फिरकीपटू अराफत सनी आणि वेगवान गोलंदाज अल-अमीन हुसेनचीही बांगलादेशच्या संघात निवड झाली आहे. या दोघांनीही आपला अखेरचा टी-२० सामना २०१६ मध्ये खेळला होता.

बांगलादेश आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका होणार असून पहिला सामना ३ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होईल. अष्टपैलू शाकिब-अल-हसन बांगलादेश संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. या मालिकेसाठी शब्बीर रहमान, तैजुल इस्लाम, रुबेल हुसेन आणि नजमूल हुसेन यांना मात्र बांगलादेशच्या संघात स्थान मिळाले नाही. तसेच प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी विनंती केल्यामुळे सलामीवीर सौम्या सरकारलाही संधी देण्यात आली आहे.

- Advertisement -

बांगलादेश संघ : शाकिब-अल-हसन (कर्णधार), तमिम इक्बाल, लिटन दास, सौम्या सरकार, मोहम्मद नईम, मुशफिकूर रहीम, मोहमदुल्लाह, अफिफ हुसेन, मोसादेक हुसेन, अमिनुल इस्लाम, अराफत सनी, मोहम्मद सैफुद्दीन, अल-अमीन हुसेन, मुस्तफिझूर रहमान, शफीउल इस्लाम.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -